पंडित जगदाळे व राजाभाऊ देशमाने यांच्या लक्षवेधी कामाची पावती
तुळजापूर दि .२४ डॉ. सतीश महामुनी
महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रामध्ये आणि नागरी पतसंस्थेच्या इतिहासामध्ये तुळजापूर खुर्द येथील तुळजाई सहकारी नागरी पतसंस्था या संस्थेला सलग पाचव्या वर्षी राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार देण्यात आला आहे,
उस्मानाबाद जिल्ह्यात असणाऱ्या सर्व पतसंस्था मध्ये या पतसंस्थेची कामगिरी स्थापनेपासून नेत्रदीपक राहिली आहे. तुळजापूर खुर्द येथील तुळजाई सहकारी नागरी पतसंस्था यांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सलग पाचव्या वर्षी दीपस्तंभ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार संचालक महेश साबळे, व्यवस्थापक संजय ढवळे, सचिन माळी, प्रमोद क्षीरसागर, विकास भोजने यांनी शिर्डी येथील दिमाखदार कार्यक्रमात स्वीकारला.
तुळजाई नागरी पतसंस्थेने आपल्या व्यवसायिक यशस्वी धोरणाने यश मिळवले आहे, संस्थेकडे २३ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. व्यापारी वर्गाला या पतसंस्थेकडून १६ कोटी ५० लाख रुपये कर्ज वितरण करण्यात आले आहे, कर्ज वसुली दर ९८ टक्के पेक्षा जास्त आहे.
काटकसरीचा व्यवहार आणि प्रामाणिकपणा याच्या जोरावर तुळजाई पतसंस्थेने अनेक वर्षापासून बँकिंग क्षेत्रात यश प्राप्त केले आहे. संस्थापक अध्यक्ष नगरसेवक पंडित जगदाळे व संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमाने यांच्यासह इतर सर्व संचालक मंडळ यांनी संस्थेच्या कारभारामध्ये यशस्वीपणे लक्ष दिल्यामुळे ही आर्थिक संस्था सदैव फायद्यात राहिली आहे. शिवाय संस्थेच्या संचालक मंडळाकडे संस्थेचा व्यवहार प्रामाणिक करण्याची मनोभूमिका आहे, पारदर्शक व्यवहार आणि लोकाभिमुख निर्णय याच्या जोरावर संस्थेने सदैव यश मिळवले आहे. सामाजिक बांधिलकी खूप मोठ्या प्रमाणावर बाळगताना संचालक मंडळाने उपस्थित ३५ रक्तदान शिबिर आयोजित करून ३ हजार बाटल्या रक्त संकलन केले आहे.
मुख्यमंत्री निधीला कोरूना काळात २१ हजार रुपयांची मदत, उस्मानाबाद येथील टेस्टिंगसाठी ५१ हजार रुपये मदत या संस्थेने केली. ७०० कुटुंबांना या आपत्तीच्या काळात किराणा साहित्य वितरित केले.
पतसंस्था फेडरेशनच्या वतीने मागील पाच वर्षापासून या पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार संस्थेच्या दरवर्षीच्या कामगिरीवर मिळतो आहे. त्यामुळे तुळजापूर शहराचा लौकिक सहकार क्षेत्रात राज्यभर सातत्याने होत आहे