तुळजापूर दि .२४
ग्रामपंचायत आरळी बुद्रुक ता . तुळजापूर आणि रोटरी क्लब तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आरळी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ४० नागरिकांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमासाठी रोटरी सदस्य आप्पासाहेब पाटील, रोटरी क्लब तुळजापुरचे अध्यक्ष रामचंद्र गिड्डे, सदानंद राव, अनिल रोचकरी, भरत जाधव, संजय जाधव, रोटरीच्या माजी अध्यक्षा ॲड. स्वाती नळेगावकर, युवा स्पंदनचे अध्यक्ष महेंद्र कावरे, उस्मानाबाद शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीचे अक्षय जगताप, माधव सूर्यवंशी, गणेश साळुंके, महादेव कांबळे, श्रीमती सुषमा घोडके, धैर्यशील नारायणकर, सरपंच गोविंद पारवे, उपसरपंच किरण व्हरकट, महोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील पारवे, छावाचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी, फौजदार संजय पारवे, प्रवीण व्हरकट, चेअरमन अनिल जाधव, व्हा. चेअरमन दादाराव पारवे, नशिबा शेख,भीमराव सोनवणे,संजय पाटील, ॲड.फारूक शेख, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष अनिल पारवे,धनाजी धोतरकर, मकरंद बामनकर आदींची उपस्थिती होती.