उमरगा दि . १४ :
महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव व शांतिदूत परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा सौ. विद्या जाधव हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजीक क्षेत्रात कार्य करीत आहेत. कोरोना काळात राज्यात शांतीदूत परिवारच्या वतीने रक्तदानाच्या अनेक शिबीराचे आयोजन करण्यात आले. प्लाज्मा दानसाठी प्रोत्साहन, रक्तदान करण्यासंबधी जनजागृती करण्यात आले.
राज्यातील अनेक ठिकाणी मोठयाप्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. अनेक तालुक्यातील गरजुंना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ मिळवुन देण्यासाठी शेतकरी मेळावे घेऊन उच्चस्तरीय प्रयत्न करण्यात आले. त्यांची ही सेवा निरंतर सुरूच आहे.
या अनेक सामाजीक कार्याची दखल घेऊन या कार्याची नोंद लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेण्यात आली. नुकतेच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेचे राष्ट्रीय सचिव डॉ. दिपक हरके, राज्य उपाध्यक्ष महेबुब सय्यद, आदम सय्यद, निर्माता दिग्दर्शक सिकंदर सय्यद यांच्या हस्ते डॉ. विठ्ठलराव जाधव यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. जाधव यांनी हा सन्मान फक्त माझा नसुन या कार्यासाठी झटणाऱ्या देशातील अनेक स्वंयसेवक व पदाधिकाऱ्यांचा असल्याचे सांगुन यामुळे यापुढेही आम्हास कार्य करण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले.