नळदुर्ग ,दि .१४ : सुहास येडगे

 शहरातील हुतात्मा निलय्या स्वामी उद्यान , हुतात्मा बाबुराव बोरगावकर उद्यान , व्यासनगरमधील विठ्ठल  मंदीर, रोकडया हनुमान मंदीर परिसरात  नगरपालिकेच्या वतीने मोठया प्रमाणावर निधी खर्चुन करण्यात आलेल्या विकास कामांची पुरती वाट लागली आहे.  ठेकेदाराने हे कामे अर्धवट ठेवल्याने ठेकेदारावर नगराध्यक्ष किंवा मुख्याधिकारी यांनी कोणतीच कारवाई केली नाही. संबधिताविरुध्द कारवाई करण्याची मागणी होत आहे.


परिणामी विकास कामे करण्यात आलेल्या ठिकाणी आता गाजर गवताचे साम्राज्य वाढले असून दोन्ही उद्यानाची दुरावस्था झाल्याचे दिसुन येत आहे.
 
 खर्च केलेले लाखो रुपये वाया गेले आहेत. त्यामुळे आता तरी पालिका प्रशासन या बाबीकडे लक्ष देईल का ?असा प्रश्न नागरीकांतून विचरला जात आहे. शहरातील बाल गोपाळांना खेळण्यासाठी व वृध्दांना फिरण्यासाठी शहरातील हुतात्मा निलय्या स्वामी उद्यान  व हुतात्मा बाबुराव बोरगावकर उद्यान  नगरपालिकेने गेल्या सहा महीन्यापूर्वी लाखो रुपये खर्च करुन विविध विकास कामे केली आहेत, ही विकास कामे करीत असताना पालिकने या ठिकाणी त्यांचा कोणताही कर्मचारी ठेवला नसल्याने ठेकेदाराकडून हे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे केले आहे, त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत जिल्हाधिकारी यांच्या बरोबर मुख्याधिकारी यांच्याकडे शहरातील नागरीकांनी व भाजपा शहराध्यक्ष पद्माकर घोडके यांनी तक्रारी केल्या होत्या. दरम्यान संबंधीत ठेकेदारांनी हे काम अर्धवट अवस्थेत ठेवल्याचे दिसत आहे. 

रोकडया हनुमान मंदीराचे विकास काम त्याचबरोबर व्यास नगर येथील विठठल मंदीर येथे बांधण्यात आलेले सभागृह याचेही काम संबंधीत ठेकेदाराकडून अर्धवट कामे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे नगरपालिका प्रशासन किंवा नगराध्यक्ष ,  मुख्याधिकारी यांनी या ठेकेदारावर कोणतीही कारवाई केली नाही. त्याच बरोबर हुतात्मा निलय्या स्वामी उद्यान  व हुतात्मा बाबुराव बोरगावकर उद्यानात  लाखो रुपये खर्च करुन त्या ठिकाणी बाल गोपाळांना खेळण्यासाठी आणि वृध्दांना फिरण्यासाठी मोठया प्रमाणात विकास कामे करण्यात आली आहेत, मोठया प्रमाणात लॉन लावण्यात आले आहे. पंरतु यावर देखरेख करण्यासाठी किंवा ठेकेदाराकडून यावर देखरेखीसाठी कोणीही ठेवले नसल्याने सध्या या लॉन मध्ये मोठया प्रमाणात काँग्रेस गवत वाढले आहे. तर लॉनवर बऱ्याच ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. 
 तर कांही ठिकाणचे लॉन ही वाळून गेले आहे. तर जिथे लॉन आहे तिथे मोठया प्रमाणात लॉनमध्ये गाजर गवत वाढून लावलेल्या लॉनचे सौदर्य नष्ट झाले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने या ठिकाणी खर्ची घातलेले लाखो रुपये आजा वाया गेले आहेत. अशी चर्चा सध्या शहरात होत आहे. 

त्यामुळे आता तरी पालिका प्रशासन जागे होवून तात्काळ संबंधीत ठेकेदाराकडून किती विकास कामे करणे बाकी आहे, त्यांची देणे बाकी किती आहे , याचा ताळमेळ घालून संबंधीत ठेकेदाराकडून उर्वरीत विकास कामे करुन घ्यावेत व सध्या दोन्ही उदयानाची झालेली आवकळा तात्काळ दुरस्त करुन उदयानाचे सौदर्य पूर्वी सारखे करुन घ्यावे अशी मागणी नागरीकांतून होत आहे.
 
Top