काटी , दि . १४
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स मानवाधिकार मिशनच्या समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर यांच्यावतीने "समाजभूषण पुरस्कार" प्रतिवर्षी देण्यात येतो. सन २०२१ पुरस्काराचे वितरण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर यांच्या हस्ते तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष माजी सैनिक शिवाजी रामकृष्ण सावंत (तामलवाडी ता. तुळजापूर) यांना देण्यात आला.
सन्मान पत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून या पुरस्कार वितरण सोहळयास
समितीच्या महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्षा ॲड.राणी स्वामी, प्रदेश कार्याध्यक्षा संतोषी मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी प्रदीप पाटील खंडापुरकर यांनी शिवाजी रामकृष्ण सावंत यांनी केलेल्या कामाचा उल्लेख करून कौतुक केले.
यावेळी समितीचे मराठवाड्यातील तसेच जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.