तुळजापूर दि . १४ :
शहरातील एका २७ वर्षीय तरुणीवर अनोळखी नराधमाने अत्याचार केल्याची घटना मंगळवार दि.१३ जुलै रोजी पहाटे पुर्वी व घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून तुळजापुर पोलीस ठाण्यात अनोळखी नराधमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत तरुणी घरात झोपली असताना
मंगळवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घराचे दार वाजण्याचा आवाज आला. त्यामुळे पीडित तरुणीने घराचा दरवाजा उघडला . यावेळी दरवाजासमोर ३० ते ३५ वर्षाचा अनोळखी इसमाने घरामध्ये घुसुन पिडीत तरुणीचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार करून,तू कोणाला सांगितली तर तुला ठार मारतो असे धमकावुन पसार झाला.
यावरून तुळजापुर पोलीस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादिवरून अनोळखी नराधमावर तुळजापुर पोलीस ठाण्यात कलम ३७६,४५२,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस करीत आहेत.