तुळजापूर दि ६ : 

राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे दोन वर्षापूर्वी परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील स्वप्नील सारख्या अनेक विद्यार्थांना अद्याप नोकरी मिळाली नाही, काही महिन्यापूर्वीच एमपीएससीच्या विषयाला घेऊन पुण्यासह संपूर्ण राज्यात आंदोलन झाले. परंतु या आंदोलनानंतर देखील राज्य शासनाने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांबाबत गंभीर नाही,  हे या घटनेवरून लक्षात येते असे अभाविपचे तुळजापूर येथे  आंदोलन प्रसंगी शहरमंत्री सौरभ कदम असे सांगितले .

स्वप्नील लोणकरच्या मृत्यूला राज्य शासनच पूर्णतः जबाबदार आहे. राज्य शासनाच्या नाकर्तेपणाने उच्चशिक्षित स्वप्नील लोणकरचा बळी घेतला आहे, अशी वेळ पुन्हा कोणत्याही विद्यार्थ्यावर येऊ नये अशी भूमिका अभाविपने आंदोलनामधून मांडली.  एमपीएससीच्या प्रलंबीत परीक्षा, ऊत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीवर रुजू करण्याची प्रक्रिया राज्य सरकारने तात्काळ पूर्ण करावी अन्यथा तीव्र आंदोलन राज्यभर करण्यात येईल असे यावेळी शहरमंत्री सौरभ कदम यांनी सांगितले.

अभाविपच्या वतीने विश्वनाथ कॉर्नर येथे एमपीएससी विद्यार्थी स्वप्निल लोणकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी तुळजापूर शहर मंत्री सौरभ, कदम सहमंत्री ,गौरव जेवळीकर, दिव्या शिरसागर, दयानंद शिंदे, ऐश्वर्या हलकुडे, शुभम काळे, शुभम काळे, प्रतीक आंबुरे, रोहित लबडे, रुपेश शिंदे, करण देशमुख, धीरज कदम, पृथ्वीराज पाटील, राज भोरे, व धाराशिव जिल्हा संघटन मंत्री गंगाधर कोलमवार यांसह अनेक एमपीएससी विद्यार्थी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
 
Top