सोलापुर/नळदुर्ग : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गेल्या वर्षभरापासून नळदुर्ग गोलाई ते बसस्थानक पर्यंत करण्यात आलेल्या महामार्गावरील दुभाजकामध्ये स्ट्रीट लाइट व प्रमुख सहा ठिकाणी हायमास्ट लैम्प करण्यात यावे यासाठी प्रयत्न करीत होते,संबंधित विभागाने नगर परिषद नळदुर्ग यांना देखभाल व दुरुस्तीचे हमीपत्र देण्यासाठी मार्च महिन्यात पत्रव्यवहार केला होता,त्याची माहिती मनसेच्या पदाधिका-यांना देण्यात आली,मनसेकडून पालिकेच्या मुख्याधिका-याशी सातत्याने हमीपत्र देण्यासाठी प्रयत्न सुरु केले, व पालिकेने देखभाल व दुरुस्तीचे हमीपत्र संबधित विभागास दिले.
त्यानंतर आज दि-६जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष श्री.अलिम शेख, शहर सरचिटणीस श्री. प्रमोद कुलकर्णी,सोलापुर मनविसे जिल्हाध्यक्ष श्री. अमर कुलकर्णी यांनी, तुळजापुर-नळदुर्ग-अक्कलकोट महामार्ग ,सोलापुर विभागाचे सार्व.बांध.वि. कार्य.अभियंता श्री. कुलकर्णी साहेब यांची प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली व वरील मागणी संदर्भात चर्चा केली,पालिकेने हमीपत्र दिल्याने स्ट्रीट लाइट करण्याचा मार्ग सुकर झाल्यामुळे कार्य.अभियंता साहेब यांनी संबंधित ठेकेदारास येत्या पंधरा दिवसात हे काम पूर्ण करायचे आदेश दिले,त्याच बरोबर महामार्गा व सर्व्हिस रस्ता दरम्यान सोडण्यात आलेल्या खुल्या जागेत बगीचा करावा,गोलाई येथील सर्कलचे सुशोभीकरण करावे,बसस्थानक समोर जंक्शन करावे आदि मागण्या मनसेच्या वतीने वारंवार मांडण्यात आल्याचे सांगण्यात आले,व तसेच या मागण्या साठी वर्षभरापासुन पाठपुरावा सुरु असून त्या संदर्भात आता हालचाली नाही झाल्यास दि-१४जुलै रोजी मनसेच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे,यावेळी अभियन्ते श्री. मिटकरी,श्री. विजयकुमार स्वामी, सोलापुर मनविसे जिल्हाध्यक्ष श्री अमर कुलकर्णी,नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी आदि उपस्थित होते.