तुळजापूर , दि. ६
तालुक्यातील आरळी बुद्रुक येथील विद्यमान उपसरपंच किरण शामराव व्हरकट यांची महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
जिल्हा परिषद उस्मानाबाद यशवंतराव सभागृह येथे महाराष्ट्र सरपंच परिषद पुणे राज्यस्तरीय विस्तार मेळावा संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष धिरज पाटील, धनेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक डॉ. प्रतापसिंह पाटील, प्रवीण रणबागुल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष धीरज पाटील, , सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले, प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ, सहसचिव सुशील तौर, राज्य कार्यकारिणी सदस्य संदीप देशमुख, कोहिनूर सय्यद,महिला प्रदेशाध्यक्ष सौ. झीनत सय्यद आदी उपस्थित होते.
निवडीनंतर माजी जि.प.सदस्य काशिनाथ बंडगर, सरपंच गोविंद पारवे, माजी उपसरपंच पापलाल सय्यद,भास्कर पारवे,बजरंग कोकाटे, प्रवीण व्हरकट, संदेश माने,मकरंद बामनकर,संजय घोडके,बाळू गवळी यांनी अभिनंदन केले आहे.