परंडा दि. १७ : फारुक शेख
परंडा तालुक्यातील कुंभेफळ येथील दलित वस्तीतील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामपंचायतीचे ग्रामस्थातुन आभिनंदन होत आहे.
अनुसुचित जाती व नव बौद्ध घटकांचा विकास करणे अंतर्गत सन 2018/19 मधे समाज कल्याण अंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी बोर ,पाईप लाईन व पाणी टाकी बांधकाम मंजुर झाले. त्यानंतर तत्कालीन सरपंच श्रीमती लतिफा सलिम बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील काम पुर्ण झाले . वीज कनेक्शन घेण्यासाठी तत्कालीन सरपंच , ग्रामसेवक यांनी महावितरणकडे पैसे भरले होते. परंतु महावितरणच्या गहाळ कारभारामुळे पाणी पुरवठा सुरु होवु शकला नाही.
माञ ग्रामपंचायतीचे विद्यमान कार्यकारणीने महावितरणकडे पाठपुरावा करुन दलित वस्तीतील पाणीपुरवठा सुरळीत चालु केला .
यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच बापुसाहेब कोटुळे ,उपसरपंच फारुक शेख ,कौशल्या नाइकोडे , अंजुम पठान , पदमीन यादव , ग्रामसेवक खटकाळे पी. टी. माजी ग्रामपंचायत सदस्य दशरथ कांबळे, पंडीत कुटुळे दशरथ गायकवाड, ग्रामपंचायत कर्मचारी फयाझ शेख आदीसह नागरीक उपस्थित होते.