तुळजापूर दि .१६ : 

रिलायन्स व लोकप्रबोधन संस्थेच्यावतीने तुळजापूर तालुक्यातील दोन गावात २५० कुटुंबांना किरणा साहित्य कोरोना आपत्तीच्या  पार्श्वभूमीवर वितरित करण्यात आले.

तालुक्यातील विधवा, परित्यक्ता, निराधार, भटके विमुक्त, स्थालांतरीत कुटूंब,अपंग,भुमीहिन रोजंदारी मोलमजूरी करणाऱ्या गरीब शेतकरी कुटुंबातील महिलांना आणि आरळी खुर्द येथील डवरी गोसावी समाजातील गरजू कुटूंबाना ह्या किराणा किटचे वाटप करण्यात आले.


 रिलायन्स फाऊंडेशन व लोकप्रबोधन सामाजिक संस्था,आरळी बुद्रुक यांच्यावतीने तुळजापूर तालुक्यात २५० किराणा साहित्य किट वाटप करण्यात आले. आरळी बु.येथे सरपंच गोविंद पारवे, ग्रामपंचायत सदस्य आश्विनी व्हरकट, प्रभाकर उळेकर,
सुधाकर कदम, शिद्राम ताणवडे, संदिप गायकवाड, अनुराधा धोतरकर यांचे हस्ते व आरळी खु.येथे सरपंच महादेव गायकवाड, पिराजी भालेकर, धनाजी पात्रे, रावसाहेब नन्नवरे,पोपट दरेकर, किसन कांबळे,अमर वाघमारे, संजय शितोळे यांचे हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले.

सदरील कार्यक्रमासाठी अजय धोतरकर,शिवराज धोतरकर तसेच
ग्रामविकास सेवा मंडळाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  लोकप्रबोधन संस्थेचे धनाजी धोतरकर यांनी केले.
 
Top