लोहारा , दि. १ 
     
तालुक्यातील बांधकाम कामगार व इतर कामगारांना ग्रामपंचायत स्तरावर नोंदणी अभियान राबवून ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्याबाबत संबंधित अधिकारी, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना आदेशीत करावे अशी मागणी छत्रपती कामगार संघटनेच्या वतीने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांच्याकडे (दि.२८) नोवेदनाद्वारे केली आहे.

     
 मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, तालुक्यातील बांधकाम कामगार व इतर कामगारांना ग्रामपंचायत स्तरावर नोंदणी अभियान राबवून ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्याबाबतमहाराष्ट्र शासनाने वेळोवेळी आदेश, परिपत्रक दिलेले असतानाही व जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांना सर्व ग्रामसेवकांना देण्यासंदर्भात आदेशीत केले असतानाही लोहारा व उमरगा तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेने शासनाच्या आदेशाला डावलून बांधकाम कामगार व इतर कामगारांना ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र न देण्याचा ठराव घेतला आहे. परंतु कांही ग्रामसेवक पत्र देण्यास तयार आहेत परंतु ग्रामसेवक संघटना प्रमाणपत्र देणाऱ्या ग्रामसेवकांवर दबाव टाकत आहे.  त्यामुळे बांधकाम कामगार व इतर कामगार यांना ९० दिवस काम केल्या बाबतचे प्रमाणपत्र देण्याबाबत  आदेशीत करावे असे निवेदनात म्हंटले आहे. 

या निवेदनावर छत्रपती कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी गायकवाड, सचिव तिम्मा माने, उपाध्यक्ष बालाजी माटे, यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 
Top