उस्मानाबाद, दि. ०१
उमरगा येथे वेश्या व्यवसाय सुरू असण-या तीन हॉटेल्स व बारवर आचानक पोलिसांनी छापा मारून 30 जणाना ताब्यात घेवुन आरोपी विरूध्द उमरगा पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1959 सह भादवि कलम 343 प्रमाणेनोंद केला आहे. आरोपीमध्ये 17 युवतींसह 13 युवकांचा समावेश आहे. या कारवाईमुळे बेकायदेशीर धंदे करणा-याचे धाबे दणाणले आहे.
उमरगा चौरस्ता येथील हॉटेल्स व लॉजवर वेश्या व्यवसाय चालत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास उस्मानाबाद स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने बुधवार दि. 30 जून रोजी दुपारी साडेबारा ते तीन वाजेच्या सुमारास उमरगा पोलिस ठाण्याच्या हाद्दीतील चौरस्ता येथिल हॉटेल हर्ष बार &रेस्टॉरंट & लॉज, अभिराज बार &हॉटेल, सुदर्शन लॉज येथे चालत असलेल्या अनैतिक व्यवसायावर पोलिस पथकाने आचानक छापा टाकुन महिला व पुरूष आरोपिना ताब्यात घेतले. यावेळी वेश्या व्यवसाय करणा-या 17 युवतीसह 13 युवकाना पोलिसानी ताब्यात घेतले. तीन तास चाललेल्या कारवाई नंतर सर्व आरेपींना उमरगा पोलिस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरार्पंत सुरू होती.
उस्मानाबाद अधीक्षक राज तिलक रोशन, पोलीस उपअधीक्षक संदीप पालवे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, सहाययक पालीस निरीक्षक मनोज निलंगेकर , पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग माने , पोलीस उपनिरीक्षक सदानंद भुजबळ, वलीउल्ला काझी, प्रदीप ठाकूर, राजेश साळुंके, शिवाजी शेळके, पालीस नाईक महेश घुगे, हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, दिपक लावरे पाटील , नाईक शैला टेळे, बबन जाधवर, बलदेव ठाकूर, अविनाश मरलापल्ले, रविंद्र आरशेवाड, कॉन्स्टेबल रंजना होळकर, धनंजय कवडे, सुभाष चोरे, अमोल पाखरे आदीनी ही कारवाई केले.