तुळजापूर दि . ३०
तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील लिपिक अर्जुन मुळे यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एन. बी.जाधव व प्रा. रमेश नन्नवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात मध्ये प्रदीर्घ सेवा पूर्ण केल्यानंतर लिपिक अर्जुन मुळे हे 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने महाविद्यालयाच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने कोरोना नियमांचे पालन करत सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी अधिक्षक पांडुरंग नागणे व महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.