तुळजापूर, दि . ११ : डॉ. सतीश महामुनी
तुळजापूर तालुक्यातील वडगाव (देव) येथे अटल घनदाट योजने अंतर्गत १० जुलै रोजी ४ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यावेळी पंचायत समिती तुळजापूर येथील सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. महामारीच्या काळात आपल्याला झाडांचे महत्व पटलेले आहे . त्यामुळे सर्वांनी वृक्षाचे संगोपन करून ही वृक्ष लागवड यशस्वी करावी असे आवाहन सहाय्यक गटविकास अधिकारी राऊत यांनी केले. वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात ४ हजार वृक्षाची लागवड करण्यात आली. त्याचबरोबर गावातील एकूण १५ महिला बचतगटांना प्रत्येकी १०० प्रमाणे १ हजार ५०० वृक्ष देण्यात आले.
यावेळी उपस्थित सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन राऊत ,जिल्हा परिषद वडगाव (देव) येथील मुख्याध्यापक विजयकुमार जाधव, ग्रामसेवक गोपाळ करदूरे ,वडगाव (देव) सरपंच पद्मिनी सगट, उपसरपंच उत्तम देवकते,उमेद तालुका समन्वयक दत्तात्रय शेरखाने, ग्रामपंचायत कर्मचारी म्हताब शेख, आदीसह ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक वर्ग, आणि ग्रामस्थ युवक उपस्थित होते.