तुळजापूर , दि . ११ :
तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथे विविध क्षेत्रात निवड झालेल्या मान्यवरांचा ग्रामस्थांच्यावतीने कौतुक सोहळा आयोजित करून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सत्कार सोहळ्यात राष्ट्रवादीच्या तुळजापुर तालुका उपाध्यक्षपदी निवड झालेले अनिल पारवे, महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद पुणेच्या उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेले किरण व्हरकट,वीरशैव लिंगायत संघर्ष समिती उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी निवड झलेले लक्ष्मण उळेकर,
आणि तुळजापुर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी निवड झालेले रामचंद्र गिड्डे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
आरळी बुद्रुक गावातील चार मान्यवरांचा सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात गावाचा नावलौकिक मिळवून देणारी कामगिरी केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने गौरवपर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी सरपंच गोविंद पारवे, चेअरमन अनिल जाधव, सहाय्यक फौजदार संजय पारवे, अरुण जोत, पोलीस पाटील युवराज पाटील, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी, ग्रा.प.सदस्य भीमराव सोनवणे, संजय पाटील,दादाराव पारवे,ॲड.फारूक शेख, राहुल पौळ,शेखर उकरंडे, धनाजी धोतरकर, तानाजी व्हरकट, भास्कर पारवे, रामचंद्र पारवे,बजरंग कोकाटे, माजी सैनिक शेकुंबर शेख,बापूसाहेब वायकर, जनार्धन व्हरकट, संदेश माने,संजय गवळी, प्रशांत व्हरकट, मकरंद बामनकर, नागेश तानवडे,राम शीतळकर,लक्ष्मण कचरे,मोहन बंडगर, प्रा.प्रशांत उकरंडे, दगडू क्षीरसागर,सुधाकर कदम,लिंबन पारवे,बाबूराव कोळी,विठ्ठल बंडगर, भगवान कचरे,विक्रम व्हरकट, जालिंदर माने,विकास जोत,प्रभाकर उळेकर आदींची उपस्थिती होती.