लोहारा , दि. ३
वाढत्या घरगुती गॅस व पेट्रोल - डिझेलची दरवाढ कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार रणजित शिराळकर यांना निवेदन देण्यात आले.
देशात घरगुती गॅस च्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे घरातील बजेट कोलमडून पडले आहे. मोदी सरकारने उज्वला गॅसच्या माध्यमातून अनेक गरीब कुटुंबाना मोफत गॅस दिले. परंतु त्याच्या बदल्यात आता त्याच गरीब कुटुंबाकडून तिप्पट दाम वसूल करण्याचे काम हे मोदी सरकार करत आहे. यामुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे मुस्किल झाले आहे. त्यातच पेट्रोल डिझेलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत.
पेट्रोल तर शंभर रुपयांच्या वर गेले आहे व डिझेल ही आता शंभराच्या घरात आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या दरवाढीचा निषेध करत आहोत. येणाऱ्या काळात जर गॅस व पेट्रोल डिझेल दरवाढ कमी नाही केली तर केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू.
या दरवाढीचा आम्ही निषेध करत असून कोणत्याही परिस्थितीमध्ये ही दरवाढ कमी केली पाहिजे अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे करत आहोत. त्यामुळे तात्काळ ही दरवाढ कमी करावी व शेतकरी, सर्व सामान्यांना दिलासा दयावा ,अश्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लोहारा शहरातील शिवाजी चौकात आंदोलन करून तहसीलदार यांच्याकडे निवेदन देण्यात आले,
यावेळी विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, राष्ट्रवादीचे लोहारा शहर अध्यक्ष आयुब शेख, जिल्हा सरचिटणीस शबीर गवंडी, युवक तालुका अध्यक्ष नाना पाटील सामाजिक न्याय विभागाचे जालिंदर कोकणे, जिल्हा कार्यकारणी सदस्य हाजी बाबा शेख, जेष्ठ नेते नागन्ना वकील, सुरेश वाघ, बहाद्दूर मोमीन, सलमान सवार, राजेंद्र कदम, अभिजित लोभे, मिलिंद नागवंशी ,गगन माळवदर,भागवत वाघमारे, प्रकाश भगत, ताहेर पठाण,सरफराज इनामदार स्पनील माटे, राजपाल वाघमारे,बिजाज चाऊस, उमेश देवकर आदी उपस्थित होते.