काटी दि ३ :
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रभाकर जाधव यांच्या मातोश्री मथुराबाई प्रल्हादराव जाधव वय वर्षे (90 ) यांचे शुक्रवार दि.2 रोजी वृद्धापकाळाने दुपारी एक वाजता निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर तामलवाडी येथे दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे, पर्तुंडे असा परिवार आहे.