काटी  दि. ३ उमाजी गायकवाड


 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अविनाश कोळी, व सरपंच आदेश कोळी यांनी मागील चार वर्षांपूर्वी सुरु केलेल्या भवानी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या क्रिडा संकुलाचे भुमीपुजन माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, सरपंच आदेश कोळी, प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके यांच्या हस्ते शनिवार दि.3 रोजी करण्यात आले. 

राज्याच्या क्रीडा विभागाने केलेल्या मदतीमुळे भवानी इंग्लिश मिडीयम स्कूल समोर अद्ययावत क्रिडा संकुल तयार होणार असून हे क्रिडा संकुल उभारणीसाठी 90 लाखांचा निधी मिळाल्याने ग्रामीण भागातील  खो-खो, कबड्डी, रनिंग, हॉलिबॉल अशा विविध खेळातील टॅलेंटला खेळण्याची संधी प्राप्त होणार आहे. शाळांच्या दर्जा सुधारतानाच मैदानी खेळासाठी शाळेला चांगले क्रीडा संकुल असणेही तितकेच आवश्यक असल्याचे पाहून भवानी ग्रामविकास व संशोधन संस्थेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष अविनाश कोळी यांनी राज्याच्या क्रीडा विभागाकडे शिक्षण विभागामार्फत क्रीडा संकुल उभारणीसाठी प्रस्ताव पाठविला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि या संस्थेला 90 लाखांचा निधी क्रीडा संकुल उभारणीसाठी मिळाला आहे. 

या निधीतून भवानी इंग्लिश मिडीयम स्कूल समोर अद्ययावत क्रीडा संकुल तयार केले जाणार असून त्या कामाचे भूमिपूजन शनिवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
          
यावेळी सरपंच आदेश कोळी, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, उपसरपंच सुजित हंगरगेकर, प्रदीप साळुंके, पत्रकार उमाजी गायकवाड,
राहुल देशपांडे (आर्किटेक्ट इंजिनिअर), व्यंकटेश कुलकर्णी (कंत्राटदार),शंकर पोटभरे, ग्रा.प. सदस्य बाळासाहेब भाले, भैरी काळे, अविनाश वाडकर, ज्ञानेश्वर  गुरव, बिरु सोलंनकर,आबा गाढवे आदीजण उपस्थित होते.
 
Top