नळदुर्ग , दि. 3
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या वर्धापणदिन व हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत मुख्यंमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधुन एसबीआय फाऊंडेशन मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्ठाण औरंगाबाद यांच्या समन्वयातुन मागील तीन वर्षापासून सुरु असलेल्या ग्रामसेवा कार्यक्रमाअंतर्गत गायरान तांडा व रामनगर ता. तुळजापुर येथे एसबीआय शाखा नळदुर्गच्या वतीने शाखाधिकारी निर्माण पारकर यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.
या दिवशी बचतीची सवय लागावी या उद्देशाने शाळेत पिग्मी डे साजरा करीत विद्यार्थ्यांना बचत पेटीचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर गायरान तांडा व रामनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात दोनशे झाडे लावण्याचा संकल्प आहे.
यावेळी दिलासा प्रतिष्ठाणचे विलास राठोड, भुषण पवार, श्रीमंत राठोड, शाळेचे मुख्याध्यापक आय. एम. शेख, सहशिक्षक पवार एस. एस., सुनिल जाधव, शिवराम चव्हाण, सुधाकर राठोड, संजय जाधव, शंकर पवार आदि उपस्थित होते.