नळदुर्ग, दि. 3 :
केशेगाव ता. तुळजापूर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. रेश्मा भिमाशंकर घंटे यांची सरपंच परिषदेच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
तुळजापूर तालुक्यातील केशेगाव ग्रामपंचायती मध्ये केलेल्या कार्याच्या योगदानाबद्दल व संघटन कौशल्याबद्दल सौ. रेश्मा घंटे यांची सरपंच परिषदेच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी दि. 1 जुलै रोजी नियुक्त करण्यात आल्याचे पत्रात सांगुन तळागाळातील लोकाच्या हक्कांसाठी व त्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करुन संघटनेच्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर करण्याचे आवाहान महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी केले आहे.
सौ. रेश्मा घंटे यांची निवड झाल्याबद्दल केशेगाव ता. तुळजापूर ग्रामपंचायतिचे उपसरपंच शेख बशीर, ग्रामपंचायत सदस्य गणपती कांबळे, ग्रामसेवक इब्राहीम शेख, सलीम शेख, दिंडेगावचे उपसरपंच गोपीचंद निकाळजे, विजय कुमार गायकवाड, सचिन बागडे, दयानंद जळकोटे, चन्नाप्पा साखरे. यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिले आहेत.