मुरुम, दि .१  :

 शेती आणि शेतकरी यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला महत्व देणारे, मर्यादित संसाधने, प्रतिकूल परिस्थितीत राज्यात हरित क्रांती घडविणारे, शेतीला आधुनिक स्वरूप प्राप्त करुन देण्यासाठी झटणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा दिवस राज्यभर कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिवाजी नगर (तांडा) दाळींब, ता.उमरगा येथे वसंतराव नाईक यांची जयंती देवदूत सामाजिक संस्थेच्या वतीने गुरुवार  रोजी साजरी करण्यात आली. 


या संस्थेचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी दाळींब ग्रामपंचायतच्या सदस्या तथा संस्थेच्या सचिव संगीता चव्हाण, सामजिक कार्यकर्ते गोविंद चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अनिल पवार, उमेश राठोड, पिटु चव्हाण, विनायक राठोड, लक्ष्मण राठोड, सचिन पवार, देवानंद राठोड, अशोक राठोड, सचिन चव्हाण आदींची उपस्थिती होती.    
                               
 
Top