लोहारा , दि. १
लोहारा येथे छत्रपती कामगार संघटनेच्या वतीने हरित क्रांतीचे प्रणेते,भटक्या समाजाचे प्रेरणा स्थान ,रोजगार हमी योजनेचे जनक असलेले व तिन वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद भुषवलेले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष तानाजी गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटना उपाध्यक्ष बालाजी माटे यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तानाजी गायकवाड यांनी कै. वसंतराव नाईक यांच्या कार्याबद्दल उपस्थित सर्व जनसेवक, कामगारांना व नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन केले. तर संघटनेचे सचिव तिम्मा माने यांनी उपस्थितांना वसंतराव नाईक महामंडळाच्या योजने संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच वसंतराव नाईक यांच्या अनमोल कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्याची पोहच म्हणून ,व तमाम जनतेला अभिमान वाटावा असा महाराष्ट्र भुषन पुरस्कार वसंतराव नाईक यांना महाराष्ट्र शासनाने देऊन सन्मानित करावे. तसेच विमुक्त जाती, जमाती भटक्या जातीच्या प्रत्येक कुटूंबाना पाच लाख रुपय कर्ज देऊन तीन लाख रुपये अनुदान मिळावे अशी शासन दरबारी मागणी उपस्थित कामगार, व जनतेनी संघटनेच्या वतीने ठराव घेऊन शासनाकडे मागणी करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी गायकवाड , संघटना उपाध्यक्ष बालाजी माटे, संघटना सचिव, तिम्मा माने, उस्मानाबाद जिल्हा सचिव बालाजी चव्हाण, जिल्हा महिला उपाध्यक्षा लिंबीकाजी गायकवाड, उमरगा तालुका अध्यक्ष राम कांबळे, तालुका उपाध्यक्षा सिंधुताई जोगी, संघटनेचे जनसेवक गहीणसिंग जाधव, नेहरू युवा केंद्राचे कार्यकर्ते निकीता गायकवाड, प्रतिभा कांबळे, शुभम गायकवाड व इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तिम्मा माने यांनी तर आभार बालाजी चव्हाण यांनी मानले.