उस्मानाबाद , दि .२६

नळदुर्ग पोलीस ठाणे : अहेमद कुरेशी, सत्यजित कांबळे, नाजिम शेख, सलीम सय्यद, माजिद इनामदार, अब्दुल शेख, सर्व रा. नळदुर्ग हे सहा जण दि. 25 जुलै रोजी 17.10 वा. सु. रहीमनगर, नळदुर्ग येथील एका पत्रा शेडसमोर तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्य व 9,040 ₹ रोख रक्कम बाळगलेले नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले.

तुळजापूर पोलीस ठाणे : प्रकाश जटाळ, अविनाश भिसे, शिवराज साठे, विशाल झाडपिडे, रामदास डोंगरे, सर्व रा. कमानवेस, तुळजापूर हे पाच जण दि. 25 जुलै रोजी 17.00 वा. सु. राहत्या परिसरातील धर्मशाळेजवळ तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्य व 7,700 ₹ रोख रक्कम बाळगलेले तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले.

           

 यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत नळुदर्ग व तुळजापूर पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

 
Top