उस्मानाबाद , दि . २६ 

स्थानिक गुन्हे शाखा तामलवाडी पो.ठा. गु.र.क्र. 83 / 2014 भा.दं.सं. कलम- 379 सह मोका कायदा कलम- 3 या गुन्ह्यातील आरोपी- भाऊसाहेब मधुकर पवार उर्फ टुरम्या, वय 48 वर्षे, रा. वडशिवणी, ता. करमाळा, जि. सोलापूर याचा पोलीस गेल्या 7 वर्षापासून शोध घेत होते. तो पोलीसांना हुलकावनी देत असल्याने त्याचा निश्चित ठावठिकाणा लागत नसल्याने पोलीस त्याच्या तपासावर होते. 


तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या पोउपनि- श्री पांडुरंग माने, श्री. सदानंद भुजबळ, पोहेकॉ- काझी, शेळके, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- बबन जाधवर, सर्जे, अविनाश मरलापल्ले, आरसेवाड, माने यांच्या पथकास भाऊसाहेब पवार हा त्याच्या गावी परतल्याची गोपनीय खबर मिळाल्याने पथकाने दि. 26 जुलै रोजी त्याच्या घरास वेढा घालून त्यास घरातून ताब्यात घेउन पुढील कार्यवाहिस्तव तामलवाडी पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.  

 
Top