उस्मानाबाद , दि १
पोलीस ठाण,उमरगा : उमरगा पो.ठा च्या हददीत उमरगा चौरस्ता नजीकच्या काही लॉजचे चालक आपल्या लॉजमध्ये काही महिलांदवारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पो.नि-गजानन घाडगे यांच्या पथकास मिळाली होती. यावर स्थागुशाचे पथक व उमरगा पो.नि- मुकुंद आघाव यांच्या पथकाने दिनांक 30.06.2021 रोजी दुपारी चौरस्ता येथील लॉजेसची तपासणी सुरु केली. या वेळी हर्ष रिसॉर्ट बार लॉजींग पाठीमागील खोल्यांमध्ये, सुदर्शन लॉज मधील खोल्यांमध्ये तसेच अभिराज लॉज ॲन्ड बिअर बार मधील खोल्यांमध्ये बंगाल येथील प्रौढ महीलांकरवी वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात असल्याचे आढळले. पोलीसांनी संबंधीत वेश्या महिलांची रवानगी महिला सुधारगृहात करुन संबंधीत लॉजचे चालक-गुडौला गौड, संजय बनसोडे, कुलदीप घंटे, गणेश कुटटी, सचिन गायकवाड, सुभाष गुत्तेदार यांसह 09 वेश्या ग्राहक अशा एकुण 15 पुरुषांविरुध्द भादसं कलम 343 सह अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायदा कलम 3,4,5 अंतर्गत 3 गुन्हे नोंदवले आहेत.