उस्मानाबाद दि . १

पोलीस ठाणे तुळजापूर  अवैध मद्य वाहतुक होत असल्याच्या  गोपनीय खबरेवरुन तुळजापूर  पो.ठा. च्या पथकाने दि. 30 जून रोजी सावरकर चौक तुळजापूर येथे  छापा टाकला. राजेश अमिन तेलंग वय 32 वर्षे, रा.तुळजापूर हे  मारुती ओम्नी कार मधुन देशी दारुच्या 180 मि.लीच्या प्रत्येकी 48  बाटल्या असलेले 30 खोकी दारु अवैधपणे  वाहुन नेतांना  आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य व वाहन जप्त करुन महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत तुळजापूर पो.ठा. येथे गुन्हा  नोंदवला आहे. 


पोलीस ठाणे मुरुम : अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन मुरुम पो.ठा. च्या पथकाने दि. 30 जून रोजी बेरडवाडी जाणारे रोडवर छापा टाकला असता  सचिन गुरुनाथ दुधभाते वय 26 वर्षे रा.धनगर गल्ली मुरुम हे विदेश दारुच्या 36 बाटल्या ,किंमत 5760 रु चा  अवैधपणे  बाळगलेल्या आढळल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य व वाहन जप्त करुन महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा  नोंदवला आहे.

 
Top