उस्मानाबाद जिल्हा: जुगार विरोधी मोहिमेदरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी काल सोमवार दि. 19 जुलै रोजी जुगार विरोधी 5 कारवाया करुन कारवायातील जुगार साहित्य व 44,880 ₹ रक्कम जप्त करुन 16 व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 5 गुन्हे नोंदवले आहेत.
1) जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन स्था.गु.शा. च्या पथकाने कळंब शहरातील अनिल भोजनालयासमोरील कॉलनीत छापा मारला. यावेळी 1) सय्यद उस्मान 2) अमजद पठाण 3) सचिन कदम 4) शेख अहमद 5) तोफिक मुंढे 6) हिरालाल गुरसाळे 7) संजय जाधव 8) हिराचंद्रकांत पायले 9) लक्ष्मण गडदुरे, सर्व रा. कळंब हे कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 23,800 ₹ रोख रक्कम बाळगलेले पथकास आढळले.
2) महेबुब इस्माईल आत्तार, रा. डिकसळ, ता. कळंब हे आठवडी बाजार, कळंब परिसरात कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 1,050 ₹ रोख रक्कम बाळगलेले कळंब पो.ठा. च्या पथकास आढळले.
3) जुगार चालू असल्याच्या खबरेवरुन स्था.गु.शा. च्या पथकाने उमरगा शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. यात पहिल्या घटनेत 1)गौतम गायकवाड 2)महाविर राठोड 3) दामोदर लामतुरे, तीघे रा. उमरगा हे बसस्थानकाच्या पुर्वेस कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 8,710 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले. दुसऱ्या घटनेत 1)विजयकुमार वाघमोडे 2) शेख शमीम 3) सगर (बुक्की मालक), तीघे रा. उमरगा हे कल्या मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 8,120 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले.
4) महेबुब मोमीन, रा. लोहारा हे लोहारा येथील कानेगांव रस्त्यालगतच्या पानटपरीसमोर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 3,200 ₹ रोख रक्कम बाळगलेले लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळले.