उस्मानाबाद ,दि . २०

लोहारा पोलीस ठाणे: महादेव विजय गोरे, रा. लोहारा (बु.), ता. लोहारा यांच्या लोहारा येथील अनुष्का हॉटेलसमोरील टपरीच्या शटरचे कुलूप गावकरी- नितेश कांबळे व अन्य एक व्यक्ती या दोघांनी दि. 17- 18 जुलै दरम्यानच्या रात्री तोडून आतील सिगारेट पॉकेट व 1,500 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या महादेव गोरे यांनी दि. 19 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380, 461, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

उमरगा पोलीस ठाणे: रेवनसिध्द सुरेश पुजारी, रा. उमरगा यांच्या उमरगा येथील ‘सागर मेडिकल व जनरल स्टोअर्स’ च्या शटरचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 18- 19 जुलै दरम्यानच्या रात्री तोडून आतील 20,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या रेवनसिध्द पुजारी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

तामलवाडी पोलीस ठाणे: विनोद सुभाष लोंढे, रा. तामलवाडी यांनी तामलवाडी येथील आपल्या गॅरेज मध्ये ठेवलेला स्मार्टफोन अज्ञात व्यक्तीने दि. 19 जुलै रोजी 10.00 ते 11.30 वा. दरम्यान चोरुन नेला. अशा मजकुराच्या विनोद लोंढे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top