तुळजापूर दि १९
भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा १९ जुलै रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने कोणतेही कार्यक्रम बॅनर आणि जाहिरात करू नये अशी सूचना केल्या आहेत, हा अनावश्यक खर्च न करता तुळजापूर येथील गेल्या ६ महिन्यापासून आजारी असणारी कुमारी प्रतीक्षा अमर बनसोडे या ९ वर्षाच्या मुलीच्या मेजर थॅलसेमिया उपचारा मधून तिचे ब्लड ट्रांसमिशन करावे लागणार आहे. तिला बोनमॅरो ट्रान्सप्लांट करायचे आहे डॉक्टरांनी हा उपचार २ आठवड्यात करण्याची सूचना केली आहे. यासाठी तब्बल १४ लाख रुपये खर्च आहे. सदर खर्च करणे प्रतीक्षा अमर बनसोडे यांच्या कुटुंबकर्ते यांना शक्य नसल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि तुळजापूर तालुक्यातील नागरिक व्यापारी उद्योजक पुजारी आणि दानशूर व्यक्ती यांनी कुमारी प्रतीक्षा बनसोडे यांना उपचारासाठी आपल्या सढळ हाताने दान करावे व तिचे आरोग्य व जीव वाचवावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी तुळजापूर नेते सागर पारडे यांनी केले आहे.
कुमारी प्रतीक्षा अमर बनसोडे खाते नंबर , बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजापूर क्रमांक- 60369655010
Ifc code- MAHB0000743
Google pay आणि phone pay
9970277551
या क्रमांकावर दानशूर व्यक्तीने थेट या मुलीच्या बँक खात्यावर रक्कम पाठवावी असे आवाहन यानिमित्ताने भाजपचे नेते सागर पारडे यांनी केले आहे.