तुळजापूर , दि .१९

संत रविदास युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कदम यांचे आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष 
 देवाप्पा शिंदे  यानीं तुळजापूर तालुक्याच्या पदाधिका-याच्या निवडी केल्या असून येथील बालाजी  कांबळे यानां तुळजापूर तालुकाध्यक्ष, मनोज शिंदे तालुका युवक संघटक व रघुनाथ कांबळे  तालुका युवक सचिव आदींच्या निवडी केल्या आहेत. 


त्याबद्दल बालाजी  कांबळे यानीं आपली जबाबदारी समजून  शहरातील संत रोहिदास सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात रघुनाथ कांबळे व मनोज शिंदे यांचा फेटा बांधून, शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार केला. 


 यावेळी दलित युवक आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कांबळे,
संत रविदास चर्मकार युवा फाऊंडेशनचे नुतन तालुकाध्यक्ष  बालाजी  कांबळे,भारीपचे शशिकांत गायकवाड, शहाजी वाघमारे (माजी नगरसेवक), नागेश गायकवाड, गोरख भाऊ पारधे, शंकर गायकवाड, पत्रकार संजय गायकवाड, आप्पा गायकवाड, आकाश गायकवाड, सुनिल वाघमारे, विठ्ठल गायकवाड,
मनोज शिंदे,रघुनाथ कांबळे, सखाराम गायकवाड तसेच नागरिक उपस्थित  होते.
 
Top