पतीचे स्वप्न साकार करण्यासाठी दुःख बाजूला ठेवून नगीना कांबळे लहुजी शक्ती सेनेत सक्रिय
तुळजापूर दि १९ डॉ. सतीश महामुनी
लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सोमनाथ कांबळे यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात मातंग समाजाची साम्राज्य निर्माण केले, दबलेला समाजाला बळ देण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली म्हणून राज्यामध्ये मातंग समाजाची ताकद उभी राहू शकली अशा शब्दात तुळजापूर पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव गायकवाड यांनी दिवंगत सोमनाथ कांबळे यांच्या कार्याचा गौरव केला.
तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहावर सरपंच परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी काटगाव येथील सरपंच नगीना सोमनाथ कांबळे आणि कार्याध्यक्षपदी केमवाडी येथील सौ छाया मारुती डोलारे यांची निवड झाली. याबद्दल लहुजी शक्ती सेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी सभापती शिवाजीराव गायकवाड, माजी उपसभापती विलास डोलारे, लहुजी शक्ती सेना चे जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, कार्याध्यक्ष संभाजी कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मी गायकवाड, तालुका अध्यक्ष किसन देडे, कुंडलिक भवाळ, लक्ष्मण गायकवाड, संभाजी कांबळे, सुरज सगट, मीडिया जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी माजी सभापती शिवाजीराव गायकवाड यांनी बोलताना खूप महत्त्वाच्या क्षणी सोमनाथ भाऊ आपणास सोडून गेले आहेत, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये लहुजी शक्ती सेना वाढली पाहिजे, मातंग समाजातील प्रत्येक तरुणाने शिक्षण घेतले पाहिजे , समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून सर्वशक्तीनिशी संघटित झाले पाहिजे ही सोमनाथ भाऊंची महत्वकांक्षा होती. प्रत्येक कार्यकर्त्याला मदत करण्यासाठी सोमनाथ भाऊ मनापासून झगडत होते आपल्या स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता त्यांनी मातंग समाजाच्या प्रगतीसाठी आणि कार्यकर्त्याच्या मजबुतीसाठी अल्पकाळात मोठी कामगिरी करून दाखवली लहुजी शक्ती सेना ची प्रचंड ताकद निर्माण केली त्यांच्या पत्नी नगीना ताई यांना सबंध मातंग समाज प्रतिसरकार म्हणून ओळखत आहे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहामुळे लहुजी शक्ती सेना मध्ये पुढे सरसावले आहेत आपण सर्वजण त्यांना सहकार्य करण्यासाठी वचनबद्ध आहोत असे सांगितले.
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना सरपंच नगीना ताई कांबळे म्हणाल्या की लहुजी शक्ती सेनेच्या कोणत्याही पदावर असो अथवा नसो आपण सदैव मातंग समाजाच्या कामासाठी पुढाकार घेत आहोत पतीचे अपूर्ण स्वप्न साकार करण्यासाठी आपण दुःख बाजूला ठेवून बाहेर पडलो आहोत समाजाच्या तरुणांनी आणि ज्येष्ठांनी ज्या भावना माझ्याजवळ व्यक्त केल्या आहेत त्याची भरपाई करण्यासाठी आगामी काळात लहुजी शक्ती सेना अधिक प्रबळ होण्यासाठी काम करणार आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात मधून लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावना मी शब्दात सांगू शकत नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणून सोमनाथ कांबळे यांनी जे कार्य उभे केले आहे आपण सर्वांनी डोळ्यांनी पाहिलेले आहे अनुभवलेले आहे माझ्यापेक्षा आपण त्यांना संघटनेमध्ये अधिक जवळून पाहिले आहे त्यामुळे त्यांच्या विचारावर विश्वास ठेवून आपण आगामी काळात मातंग समाजाच्या प्रगतीसाठी काम करू आपल्या मध्ये असणारे हेवेदावे दूर करून एकसंघ होण्यासाठी लहुजी बाबांचा आशिर्वाद आपणा सर्वांना मिळावा त्यामधून मातंग समाजाची प्रगती निश्चितपणे होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रास्ताविक लक्ष्मण क्षीरसागर यांनी केले व आभार विद्यार्थी जिल्हाप्रमुख अमोल सकट यांनी मानले सोलापूर लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.