लोहारा , दि . १९

 येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्यू मधून महाविद्यालयातील व परिसरातील 45 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. 
औरंगाबाद येथील धूत ट्रान्समिशन कंपनी मध्ये 23 विद्यार्थी व अन्नपूर्णा फायनान्स मध्ये 22 विद्यार्थीची निवड झाली. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस माननीय आमदार सतीश भाऊ चव्हाण व प्राध्यापक सतीश इंगळे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

कॅम्पस इंटरव्ह्यू यशस्वी होण्यासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफीसर प्रा. अमरसिंह माळी महाविद्यालयाचे प्राचार्य वीरभद्रेश्वर स्वामी ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफीसर राजाराम निकम, राजपाल वाघमारे,स्वाती निकम, नॅक समन्वयक व्यंकट चिकटे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
 
Top