जळकोट, दि. १
 तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील पार्वती कन्या शाळेत हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून साजरा करण्यात आला.


वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. लता सोमवंशी- कदम यांच्या हस्ते करून पार्वती कन्या शाळेच्या प्रांगणात जळकोट विचार मंचच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू कदम, महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनचे नूतन प्रदेश उपाध्यक्ष तथा पत्रकार मेघराज किलजे, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे उपाध्यक्ष बबन मोरे, शिवजन्मोत्सव समितीचे ॲड. सचिन कदम, शिवजन्मोत्सव समितीचे ब्रह्मानंद कदम, पार्वती कन्या शाळेचे सहशिक्षक विजयकुमार मोरे, पंडित कदम, बसवराज मडोळे, दिनेश कलाल, उमेश गंगणे राजकुमार कारले , श्रद्धानंद स्वामी, आकाश कदम, मल्लिनाथ मडोळे, सेविका सौ.लाळे, सौ.मडोळे आदीसह जळकोट विचार मंचचे सदस्य उपस्थित होते.
 
Top