अचलेर , दि . २२
लोहारा तालुक्यातील अचलेर भिमनगर येथील तरुण युवक कु.लिंबाजी माने यांच्या संकल्पनेतून बुद्ध विहारात दररोज सकाळी व गुरुवार आणि रविवार हे दोन दिवस सायंकाळी त्रिसरण पंचशील घेतले जात आहे..
"लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असतो,आकार द्यावा तशी मूर्ती घडत असते".म्हणून या कोवळया मुलांच्या मनावर बौद्ध धम्माचे संस्कार जडावेत या शुद्ध हेतूने हा स्तुत्य उपक्रम लिंबाजी माने याने हाती घेतला आहे.
यावेळी भिमनगर मधील सर्व चिमुकले मुले, मुली दररोज वेळेत हजर राहतात.
यावेळी लिंबाजी हा या चिमुकल्या मुलांना गौतम बुध्दाच्या व बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्याची माहिती देतो. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहेत