उस्मानाबाद , दि. ८
उस्मानाबाद जिल्हा: गेल्या काहि महिन्यां पासुन जिल्हयातील एक तरुण मोटार सायकलने एका विवाहीत शिक्षीकेचा पाठलाग करत असे. दिनांक 06 जुलै रोजी त्याने त्या महिलेच्या घरासमोर जाउन मोटारसायकल इंजीनाची गती जोरजोरात कमी-जास्त करुन व मोटारसायकलचे भोंगे वाजवुन त्या महिलेचे चित्त वेधुन घेण्याचा प्रयत्न केला. यावर त्या महिलेसह तिच्या पतीने त्यास हटकले असता त्या तरुणाने व त्या सोबत मोटारसायकलवर असलेल्या अन्य दोघा तरुणांनी त्या पती- पत्नीस शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी देउन धक्काबुक्की केली. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भादसं कलम 323, 354, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोदंविण्यात आलेला आहे.