उस्मानाबाद , दि. ८

पोलीस ठाणे नळदुर्ग: साखर कारखाना परिसरात राहणा-या विमल राजपुत यांच्या बंद घराचे कुलुप अज्ञाताने दिनांक 05 ते 07 जुलै दरम्यान तोडुन घरातील 16 ग्रॅम सुवर्ण दागिने, 17 ग्रॅम चांदी व शेजारी राहणारे चंद्रकांत बुटटे यांची घराबाहेर ठेवलेली  मोटारसायकल एम एच 05 डीजी 1871 चोरुन नेली. यावरुन  भा.दं.सं. कलम- 454, 380  अंतर्गत गुन्हा नोंदवला  आहे.

 

पोलीस ठाणे तुळजापूर : तुळजापूर येथील कन्या शाळा परिसरात राहणा-या राजे्रद जाधव व जयाजी देवबुडे या दोघांच्या बंद  घराचे  कुलुप  अज्ञाताने दिनांक  06 जुलै  रोजी  10.00 ते 16.00 दरम्यान तोडुन  दोन्ही घरांतील

97 ग्रॅम सुवर्ण दागिने व  रोख रक्कम  2,10,700 चोरुन नेली.  यावरुन  भा.दं.सं. कलम- 454, 380  अंतर्गत गुन्हा नोंदवला  आहे.

 
Top