उस्मानाबाद , दि. ८

जिल्हा परिषदेचे नुतन मुख्य कार्यकारी राहूल गुप्ता यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे. उस्मानाबादचे मुख्य कार्यकारी आधिकारी  डाँ. विजयकुमार फड यांची  बदली झाल्याने त्यांच्या जागी राहुल गुप्ता उस्मानाबाद जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नुकतेच रुजु झाले आहेत.
 उस्मानाबाद जिल्हा सरपंच परिषदेच्या वतीने गुरूवार दि.८ रोजी नुतन सी ई ओ राहुल गुप्ता यांचे स्वागत व  सत्कार करण्यात आला.


 याप्रसंगी सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष सुजित किसनराव हंगरगेकर,राज्य कार्यकारीणी सदस्य सय्यद ,कार्याध्यक्ष बाळासाहेब जेवे,उस्मानाबाद तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष नितीन चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष सरपंच परिषद किरण व्हरकट व संजय आसलकर,जयसिंग बोराडे, करीम  बेग, आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top