तुळजापूर, दि . ८ :
जिव्हाळा बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि अंबिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था या तुळजापूर येथील महिला संस्थाच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले.
तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथे जिव्हाळा संस्था व अंबिका संस्था या दोन संस्थेच्या वतीने सरपंच हरिभाऊ भोसले व तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत पारवे, रोटरी क्लब अध्यक्ष ॲड. स्वाती नळेगावकर ,आमदार संवाद मंच अध्यक्ष डॉ. सतीश महामुनी, संस्थेचे अध्यक्ष सौ अश्विनी राजेश शिंदे, सौ. नंदूबाई भोसले, ग्रामपंचायत सदस्य मारुती टकले, विकास शिंदे, शिवाजी शिंदे, बालाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या दोन महिला संस्थेच्या वतीने बसवंतवाडी येथे या पूर्वी करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कार्यक्रमाला पदाधिकार्यांनी भेट दिली होती, येथील जलसंधारण व वृक्षारोपणाचा कार्यक्रमाचे यावेळी कौतुक करण्यात आले या गावात ग्रामस्थांची असणारी एकजूट आणि कष्टाळू वृत्ती खूप चांगली आहे. यापुढे येथील जे शेतकरी आपल्या शेतामध्ये वृक्षारोपण करण्यास इच्छुक असतील त्यांना आमच्या संस्थेच्या वतीने वृक्ष देण्यात येतील , त्याचे संगोपन संबंधित शेतकऱ्यांनी करावे असे आवाहन रोटरी क्लब अध्यक्ष ॲड. स्वाती तळेगावकर यांनी केले.