तुळजापूर दि ८ :
कृषी क्षेत्र आणि ग्रामीण भाग याच्याशी निगडित असणारे भारतीय जनता किसान मोर्चा तुळजापूर तालुका अध्यक्षपदी युवक नेते गजानन वडणे यांची निवड करण्यात आली, निवडीनंतर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी युवक नेते गजानन वडणे यांची भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा तुळजापूर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली . भाजपा किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे यांच्या उपस्थितीत मराठवाडा विभागाच्या शेतकरी संवाद अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी गजानन वडणे यांची नियुक्ती जाहीर केली.
यावेळी प्रदेश सरचिटणीस मकरंद कोरडे, सुधाकर भोयर, प्रदेश चिटणीस रंगनाथ सोळंकी, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, समन्वयक माजी जि. प.अध्यक्ष नेताजी पाटील, मराठवाडा समनवयक रामदास कोळगे, प्रदेश सदस्य खंडेराव चौरे, व्यंकट गुंड,नितीन भोसले, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय पाटील,माजी पं. स. सदस्य साहेबराव घुगे,ओबीसी जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, बबन सोनवणे,लोकसभा विस्तारक आण्णा पवार, सुदर्शन जाधव,औदुंबर जमदाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते