नळदुर्ग ,दि . १६ : 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष   राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन, प्रदेश सरचिटणीस    दिलीप धोत्रे यांच्या हस्ते  जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या उपस्थित  नळदुर्ग शहरातील अनेकजण प्रवेश केले आहे.


वसंत नगर, वडारवाड़ा  येथील   रवि राठोड यांच्या नेतृत्वाखाली दिलीप राठोड,सौरभ राठोड, विनोद राठोड, सुनील राठोड, शेखर राठोड, आलकेश राठोड, सुनील राठोड, दीपक राठोड, किरण राठोड, तेजस राठोड, महेश राठोड, अमर राठोड, अतुल राठोड,सुनील चव्हाण, करण चव्हाण, विजय चव्हाण, रोहितदास चव्हाण, महेश आडे,विकी जाधव,दत्ता गायकवाड, नवनाथ दंडगुले, तानाजी बंडगर आदींनी मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.


या पक्ष प्रवेशवेळी प्रदेश सरचिटणीस  दिलीप धोत्रे यांनी आगामी नगरपालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढा असा आदेश पदाधिका-यांना दिला आहे


 याप्रसंगी जिल्हाध्यक्ष  नवगिरे यांनी पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून मार्गदर्शन केले,


यावेळी जिल्हा उपाध्यक्ष   महेश जाधव, जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, जनहित कक्ष व विधी विभागाचे ॲड.मतीन बाडेवाले,तालुका सरचिटणीस गिरीष पाटील, शहराध्यक्ष  अलिम शेख, शहर सरचिटणीस  प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष  रमेश घोडके, मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, सचिव आवेज इनामदार, उपाध्यक्ष निखिल येडगे, संदीप वैद्य, अमीर फुलारी आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक  प्रमोद कुलकर्णी यांनी केले तर आभार शहराध्यक्ष  अलिम शेख यांनी मानले.
 
Top