उस्मानाबाद , दि . १४ :
उस्मानाबाद जिल्हा: जुगार विरोधी मोहिमेदरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी काल मंगळवार दि. 13 जुलै रोजी जिल्हाभरात जुगार विरोधी 11 कारवाया करुन कारवायातील जुगार साहित्य व 8,220 ₹ रक्कम जप्त करुन 12 व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 11 गुन्हे नोंदवले आहेत.
1) जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन उमरगा पो.ठा. च्या पथकाने उमरगा शहरातील बसस्थानक परिसरात वेगवेगळ्या दोन ठिकाणी छापे मारले. यात 1)जाकीर औटी, रा. काळे प्लॉट हे कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 370 ₹ रोख रक्कम बाळगलेले तर 2) संतोष तेली, रा. पतंगे रोड हे मुंबई मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 410 ₹ रोख रक्कम बाळगलेले पथकास आढळले.
2) सचिन गुंजोटे, रा. येणेगुर, ता. उमरगा हे गावातील चौकातील पानटपरीजवळ कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 540 ₹ रोख रक्कम बाळगलेले मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.
3) हैदर शेख, रा. अणदुर, ता. तुळजापूर हे गाव शिवारात कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 1,100 ₹ रोख रक्कम बाळगलेले नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले.
4) आजम तांबोळी, रा. ख्वॉजानगर, उस्मानाबाद हे शहरातील इंदिरानगर परिसरात कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 1,490 ₹ रोख रक्कम बाळगलेले उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकास आढळले.
5) याकुब फकीर, रा. भुम हे शहरातील गोलाई चौकात कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 520 ₹ रोख रक्कम बाळगलेले भुम पो.ठा. च्या पथकास आढळले.
6) 1) सलीम बागवान, रा. सावरगाव (पु.), ता. कळंब 2) महेश कराळे, रा. कळंब हे दोघे कळंब येथील एका किराणा दुकानामागे मिलन नाईट जुगार चालवण्याचे साहित्य व 1,210 ₹ रोख रक्कम बाळगलेले कळंब पो.ठा. च्या पथकास आढळले.
7) प्रभु लांडगे, रा. कुक्कडगाव, ता. परंडा हे गावातील बस थांब्यासमोर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 560 ₹ रोख रक्कम बाळगलेले आंबी पो.ठा. च्या पथकास आढळले.
8) शहाजी लोंढे, रा. रामनगर, उस्मानाबाद हे राहत्या परिसरात कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 650 ₹ रोख रक्कम बाळगलेले आनंदनगर पो.ठा. च्या पथकास आढळले.
9) रजनीकांत जोगदंड, रा. माकणी हे गावातील पत्रा शेडसमोर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 870 ₹ रोख रक्कम बाळगलेले लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळले.
10) राहुल ओव्हाळ, रा. भिमनगर, येरमाळा हे गल्लीतील पानटपरीमध्ये कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 500 ₹ रोख रक्कम बाळगलेले येरमाळा पो.ठा. च्या पथकास आढळले.