तुळजापूर ,दि . १४
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष शिवाजी रामकृष्ण सावंत (माजी सैनिक) व त्यांचे सहकारी यांनी कार्यकर्ता संमेलन आयोजित केलेल्या कार्यक्रमात कोरोना योद्धांचा सन्मान सोहळा समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी समितीच्या महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्षा ॲड.राणी स्वामी, प्रदेश कार्याध्यक्षा संतोषी मोरे प्रमुख पाहुणे म्हणून १२४ कोविड सेंटर येथील डॉ शुभम जाधव, झाडे ए आर (कोविड सेंटर प्रमुख), अंकित गायकवाड (कोविड लॅब टेकनिशियन), श्रीमती आफ्ररीन (सिस्टर), श्रीमती कालुंके (सिस्टर), महेश अड्सुळे (सेवक), निजाम पठाण (सेवक), अक्षय कदम (सेवक), मयुर कदम (सेवक), अजित कसबे (सेवक), शिवाजी जाधव, सतीश लोंढे, शिवाजी सावंत, सुरज राऊत, श्रीमती सूर्यवंशी , रामेश्वर मदने, इसाक शेख, सरफराज पटेल, सय्यद सामद तसेच खूप सारे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रशस्तीपत्र, शाल व श्रीफळ असे सन्मानाचे स्वरूप होते.या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष शंकर कदम यांनी केले, हा सन्मान सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने शहराध्यक्ष संतोष यादव व शहर उपाध्यक्ष रफिक पठाण तसेच जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.