किलज , दि. १२

 तुळजापूर तालुक्यातील किलज - सिमदरा तांडा हा अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेला रस्ता शेतरस्ता म्हणून का असेना अखेर तयारीसाठी मुहुर्त लागला खरा पण..! संबंधित ठेकेदाराने थातूर-मातूर कामाची सुरुवात केली व पाहिजे तेवढ्या जास्त प्रमाणात दगड, खडी न अंथरता अल्पप्रमाणात मुरुम खडी अंथरल्याने दि.७ व ८ जुलै रोजीच्या जोरदार पावसात सर्व मुरुम वाहून गेला असून रस्ता पुन्हा पुर्ववत झाला असल्याचे या परिसरातील सर्व शेतक-यांनी सांगितले.


किलज-सिमदरा तांडा हा पक्का व डांबरीकरण रस्ता व्हावा अशी येथील ञासलेल्या शेतक-यांची अनेक वर्षांपासून‌ची मागणी आहे. शेतक-यांनी गावपुढा-यांसह, आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींकडे साकडे घातले. परंतू केवळ अश्वासानाच्या खैरातीवरच त्यांना समाधान मानावे लागले. सदरचा रस्ता काही अंशी पाणंद स्वरुपाचा असून खडक, चिखल, पाणी, दगडगोटे आणि एक मोठा ओढा अशा संकटांचा आहे. रस्त्यात आडवे असलेल्या ओढ्यात पावसाळ्यात मोठ्या क्षमतेने पाणी साचत असल्याने शेतक-यांना मोठा संकटाचा सामना करावा लागतो. एवढेच नाहीतर ओढ्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्यास सात-आठ दिवस शेताकडील संपर्क तुटतो .  त्यामुळे या ठिकाणी मोठा पूल बांधण्याची गरज आहे असे शेतक-यांनी सांगितले.

 पक्का किंवा डांबरीकरण रस्ता कुठेच राहिला..!  परंतू शेतरस्त्याच्या नावाखाली करण्यात येत असलेल्या कामाचा दर्जामुळे शेतकरी कमालीचे नाराज असून रस्ता तयार करण्यासाठी टाकलेला मुरुम जोरदार पावसात वाहून गेला आहे. या संदर्भात संबंधित ठेकेदाराची चौकशी करावी व येथील रस्ता मजबूत तयार करावा अशी मागणी होत आहे.
 
Top