नळदुर्ग , दि . १२: सुहास येडगे
नळदुर्ग येथे राजपूत समाज मेळावा संपन्न झाला असून या मेळाव्यात अखिल भारतीय क्षत्रिय संघटनेच्या तुळजापुर तालुका अध्यक्षपदी सरदारसिंग ठाकुर यांची तर युवक संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी संदीपसिंह हजारी यांची एकमताने निवड करण्यात आली.
महाराष्ट्रातील राजपुत समाज बांधवांनी एकाच संघटनेच्या छताखाली काम करणे हि काळाची गरज असल्याचे प्रतीपादन अखिल भारतीय क्षत्रिय संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राजेन्द्रसिंह राजपुत यांनी नळदुर्ग येथील समाज मेळाव्यात बोलताना केले.नळदुर्ग येथील अंबाबाई मंदिराच्या सभागृहात राजपुत समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी हिंदूसुर्य महाराणाप्रतापसिंह यांच्या प्रतीमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नळदुर्ग राजपुत समाजाचे अध्यक्ष सुधीरसिंह हजारी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन अखिल भारतीय क्षत्रीय युवा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संग्रामसिंह सुर्यवंशी, वरिष्ठ महामंत्री दिलीपसिंह ठाकुर,उपाध्यक्ष जीवनसिंह बायस ,नाशिक विभागीय अध्यक्ष चंद्रशेखरसिंह राजपुत ,मराठवाडा महिला अध्यक्षा हेमलता दिनोरीया, सरदारसिंह ठाकुर ,देविसिंह राजपुत ,अँड.प्रथ्विराज सद्दीवाल ,रणजितसिंह ठाकुर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना राजेन्द्रसिंह म्हणाले कि,समाजातील काही संघटना युवा पीढीचे माथी भडकाऊन स्वताची पोळी भाजुन घ्यायची असा प्रकार करीत आहेत.अशावेळी वेळी युवकांवर गुन्हे दाखल झाल्याने त्यांचे करीयर बर्बाद होत आहे. त्यामुळे युवा पीढीने यापुढे सावध भुमिका घ्यावी .कोणत्याही संघटने मध्ये युवा पीढि असेल तरच त्या संघटनेचे भवितव्य उज्वल असते त्यासाठी अखिल भारतीय क्षत्रिय संघटनेमध्ये जास्तीत जास्त युवकांना संधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले . महाराष्ट्रात राजपुत विखुरलेला असल्याने यांची एकजूट करून गावोगावी या संघटनेच्या शाखा स्थापीत करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहण्याची त्यांनी ग्वाही दिली.यावेळी संग्रामसिंह सुर्यवंशी यांनी संघटनेचे ध्येय धोरणे स्पष्ट केले.
या बैठकीस नळदुर्ग विकास सोसायटीचे चेअरमन सुरेशसिंह हजारी, मानसिंह ठाकुर, दशरथसिंह ठाकुर, विजयसिंह हजारे, जमनसिंह ठाकुर, दिलिपसिंह ठाकुर, शुभम हजारे यांच्यासह राजपुत समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.