उस्मानाबाद , दि . 12
चोरीच्या गुन्हयातील तिघा आरोपी पैकी दोन आरोपीचे पोलिसानी मुसक्या आवळुन चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी सव्वा आठ लाख रूपये किंमतीचे वारी कंपनीच्या 150 सोलार प्लेट जप्त केले. ही कारवाई रविवार दि . 11 जुलै रोजी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केली आहे.
गुरन 168/2021 कलम 379 भादंवी प्रमाणे दाखल गुन्ह्यात गोपनीय बातमीदार याच्याकडुन माहिती घेवुन गुन्ह्यातील 3 आरोपी निष्पन्न झाले . त्यातील दोन आरोपी बालाजी दगडु थोरात वय 33 वर्षे , हुसेन ईनुस सय्यद वय 22 वर्षे . दोघे रा कौडगाव उस्मानाबाद याना ताब्यात घेऊन , त्याच्याकडुन गुन्हयातील गेला माल वारी कंपनीच्या 150 सोलार प्लेट एकुण किमत 8 लाख 23 हजार 950 रुपयेचा मुद्देमाल पोलिसानी जप्त केले . त्यांची वैधकीय तपासणी करून रिपोर्ट सह पोस्टे उस्मानाबाद ग्रामीण येथे हजर करून गुन्हा उघडकीस आणला आहे.
पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली साहय्यक पोलिस निरीक्षक निलंगेकर ,पोलिस उपनिरीक्षक भुजबळ , पोहेका काझी , पोलिस कर्मचारी लाव्हरे पाटिल , ढगारे , बलदेव ठाकुर , सावंत , सर्जे , चालक कवडे , चौरे आदीजण या कारवाईत सहभागी होते. याप्रकरणी उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात स्थानिक गुन्हा शाखेचे साहय्यक पोलिस निरीक्षक एम डी निलंगेकर यानी फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस करीत आहे.