तुळजापूर , दि . २०

तुळजापूर येथील शासकीय आयटीआय कॉलेजमध्ये ड्रेस मेकींग या एक वर्षे कालावधीच्या कोर्ससाठीची प्रवेश प्रक्रियेला 15 जुलैपासून सुरुवात झाली आहे. आज स्वयंपूर्ण भारत निर्माण करण्यासाठी उत्तम दर्जाचे कौशल्य क्षमता निर्माण करण्याची गरज असून हि गरज पूर्ण करण्याची क्षमता तुळजापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत असल्याचे मत निदेशक सौ. स्मिता शिंदे यांनी व्यक्त केले.

    
 कोरोना काळात अनेकांच्या  नौकऱ्या गेल्या त्यामुळे काम करणाऱ्या व मागणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी व तरुणांची संख्या वाढत असून त्यांच्या हातांना ड्रेस मेकींग कोर्सच्या माध्यमातून कौशल्य शिकविण्याची आणि त्यांच्यात जिद्द निर्माण करण्यासाठी तुळजापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था काम करत आहे. औद्योगिक जगतात दीर्घकाळासाठी आपल्या करियरची सुरुवात चांगल्या प्रकारे करायची असेल तर आयटीआय कॉलेज पर्याय नाही. तुळजापूर येथील आयटीआय प्रशिक्षण संस्थेत दहावी पास व नापास विद्यार्थी, विद्यार्थीनींना स्वावलंबी बनविण्यासाठी ड्रेस मेकींग या एक प्रशिक्षण कालावधी कोर्ससाठी 15 जुलैपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून या कोर्ससाठी वयाची कुठलीही अट नाही. या प्रशिक्षण कालावधीत सर्व साहित्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून मोफत मिळणार आहे.
      

आयटीआय मधील ड्रेस मेकींग ट्रेड हा महिलांना भविष्यात स्वावलंबी करणारी शिवण कला आहे. हा कोर्स पुर्ण केल्यानंतर आपल्या व्यवसायाबरोबरच नौकरीची संधी सुध्दा उपलब्ध होणार आहे. या संस्थेत ड्रेस मेकींग कोर्स प्रशिक्षित झालेले स्वतःचा व्यवसाय सांभाळून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवित आहेत. तुळजापूर येथील आयटीआय मध्ये ड्रेस मेकींग ट्रेड  हा उत्तम प्रशिक्षण देणारा कोर्स असून येथील प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षकांना या कोर्स मध्ये निदेशक सौ. स्मिता धनंजय शिंदे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली लहान मुला,मुलींचे मोठ्या मुलींचे, स्त्रियांचे वेगवेगळ्या फॅशनचे ड्रेस कटिंग करून शिवणकाम शिकवले जाते. तसेच स्त्रियांचे वेगवेगळ्या फॅशनचे ब्लाऊज तसेच विविध  पॅटर्नचे ब्लाऊज कटिंग व शिवणकाम, विविध फॅशनचे वेगवेगळे इंडियन, वेस्टर्न गारमेंट कटिंग, शिवणकाम काम, एम्ब्राईडरीचे टाके कसे घ्यावे, कॉम्प्युटरवर फॅशनचे स्केचेस तयार करणे हे शिकवले जाते. 
         

ड्रेस मेकींग  या एक वर्षाच्या कोर्सच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थीना व्यवसायातील करिअरच्या संधी,गारमेंट कंपनीमध्ये रोजगाराची संधी, शासकीय नोकरीत महिलांना प्राधान्य, स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी बँकेचे कर्ज, तसेच फॅशन डिझायनर, व स्वतःचा शिवन क्लास सुरू करणे, स्वतःचा टेलरिंगचा व्यवसाय सुरू करता येत असल्याने ड्रेस मेकिंग ट्रेडला प्रवेशासाठी आपला प्रवेश आजच निश्चित करुन स्वावलंबी व्हावे असे आवाहन शासकीय आयटीआयच्या कुशल  निदेशक सौ स्मिता धनंजय शिंदे  यांनी केले असून अधिक माहितीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुळजापूर येथे  संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
 
Top