तुळजापूर , दि. १७
कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील ग्रामपंचायतच्या जागेवरती अतिक्रमण करून अनेक वर्षापासून राहणाऱ्या १९ दलित कुटुंबाना ग्रामपंचायतकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबवून घरे हटवण्याच्या घटनेचा तुळजापूर येथील रिपाईकडून निषेध करण्यात आला आहे.
खामसवाडी ग्रामपंचायत , गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्या समक्ष अतिक्रमण काढून बेघर केलेली ही घटना निषेधार्थ असून सर्वोच्य न्यायालयाने कोरोना कालावधीत व पावसाळ्यात रहिवासी क्षेत्रातील अतिक्रमण काढू नये आसे निर्देश दिलेले आसताना देखील खामसवाडीत ही घटना घडली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तालुका तुळजापूरच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून अतिक्रमण काढून बेघर केलेल्या १९ दलितांच्या कुटुंबाना त्वरित सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करून पक्की घरे त्वरित बाधूंन द्यावी, दोषी आधिकारी, कर्मचारी यांच्या वर कडक कारवाई करावी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या प्रकरणी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. तुळजापूर पोलीस निरीक्षक काशीद यांना जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम,प्रकाश कदम, विधानसभा अध्यक्ष अरुण कदम,शहराध्यक्ष, प्रताप कदम ,जेष्ठ कार्यकर्ते अमोल कदम, युवक शहराध्यक्ष यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत
दलित कुटुंबाला संरक्षण दिले पाहिजे गोरगरीब लोक अनेक वर्षापासून या जागेवर राहत असल्यामुळे त्यांचा सहानुभूतीने विचार करून जिल्हा प्रशासनाने तात्काळ या प्रकरणी निर्णय घ्यावा अशी मागणी जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम यांनी तुळजापूरा केले आहे