काटी , दि . १८

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ आणि निष्ठावंत नेते कै. श्रीरंग (अप्पा) साळुंके यांच्या स्मृतिप्रीत्यार्थ वृक्षारोपण करण्यात आले.

त्यांचे चिरंजीव महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे माजी संचालक प्रदीप साळुंके यांनी शेतामध्ये मागील वर्षेभरापासून वडाच्या झाडाची चांगल्या प्रकारे जोपासना करुन वडिलांनी जशी मायेची छाया दिली तशी छाया सर्वांना मिळावी या उद्देशाने नवीन सुरू असलेल्या दोन पदरी काटी-सावरगाव रस्त्याच्या कडेला सोसायटीचे माजी व्हाइस चेअरमन अतुल सराफ जोपासण्यात आलेल्या वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.
           

यावेळी अतुल सराफ, प्रदीप साळुंके, सुनिल शेंडगे आदीजण उपस्थित होते.
 
Top