अक्कलकोट दि. १७ : 

तालुक्यातील महसूल विभागाचा कान, नाक, डोळे, समजले जाणाऱ्या कोतवाल कर्मचारी संघटनेची वार्षिक बैठक ,पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला.

  या बैठकीत कोतवाल कर्मचारी अध्यक्षपदी शफील वाडीकर यांची बिनविरोध निवड झाली असून, उपाध्यक्षपदी रेवनसिद्ध सुतार तर सचिव पदी शिवानंद कोळी यांची एकमताने निवड करण्यात असून, नूतन पदाधिकारी पुढील प्रमाणे प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ आलूरे, कार्याध्यक्ष शिवशरण कोळी, खजिनदार सुनील मुलगे, सहसचिव सूर्यकांत रामपुरे, सल्लागार दत्ता कोळी, हणमंत सानप, मल्लू जमादार, महादेव चव्हाण,  प्रवक्ता नजीर शेख, सह खजिनदार स्वामींनाथ जमादार, महिला प्रतिनिधी प्रमुख सूचिता काळे, ममता कोळी, अंबूबाई चव्हाण, रेणुका कुंभार, सह कार्याध्यक्ष बाबू कोरबू, यांची एकमताने निवड झाली.
           
या बैठकीसाठी महाराष्ट्र कोतवाल कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस कृष्णा शिंदे, सोलापूर जिल्हा कोतवाल कर्मचारी संघटनेचे नूतन अध्यक्ष विठ्ठल गुरव, सचिव अनिल जाधव, व तसेच प्रमुख पाहुणे रशीद हरकारे, उपस्थित होते. अक्कलकोट तालुक्याचे कोतवाल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल गुरव यांची सोलापूर जिल्हा कोतवाल संघटनेच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने अक्कलकोट तालुका कोतवाल संघटना अध्यक्ष पद रिक्त होते. त्याचबरोबर पूर्ण संघटनेचे पदाधिकारी यांची  फेर निवड करण्यात आली.
             

या बैठकीला तलाठी नूरदिन मुजावर, कोतवाल प्रविणकुमार बाबर, चंदु तळवार, वीरभद्र स्वामी, फिरोज ताबोळी, एस एस कोळी, बदेनवाज डफेदार, डी जी काबळे, पी टी शिवशर, अवधूत पुजारी, जे टी कागदे, महातपा, नागुरे, सोमनाथ कुभार, जगदीश देसाई,जीवन घंटे, आकाश घंटे, प्रविण गुजले, काशीनाथ माने, एन के मुजावर, अनिल जमादार बसवराज गायकवाड , आदी कोतवाल कर्मचारी उपस्थित होते.
 
Top